हातात हात घेऊन,
पावला पावलांवर साथ देऊन,
दूर निघून गेलीस
काहीही न विचारले तुला,
काहीही न समजवले तुला,
डोळ्यातील अश्रू न सावरता गेलीस
आठवणीतच राहून जगायचे
असे ठरवले मी
त्या वेदानांना विसरायचे
असे ठरवले मी
जात असशील जा, नाही अडवणार मी,
कारण
शेवटला प्रेम केले नाहीस तू
तुझयावर प्रेम केले मी