का माझं जगण इतकं एकट एकट झालय??
कुठलं आहे हे वादळ, जे फक्त माझ्याच जीवनी आलय?
जीवाला जीव देणारी, कीती माणस असतात..
वेडी प्रीत करताना, कीती जण दीसतात..
एवढ्या गच्च भरलेल्या जगात,कुणीतरी असेल का लपलं?
कारण मलाही हवं वाटू लागलाय, हक्कच कुणी आपलं.
आनंद एकटीच साजरा करते मी, दु:खात एकटीच झुरते मी.
कुणीच नाही असं, जीथे मन मोकळं करता येईल.
कुणीच नाही असं ,जीथे रीत आभाळ भरता येईल.
ओथांब्लेल्या भावना माझ्या,साठवते एका वहीत,
रात्रन दिवस बसलेले असते, एकटेपणा मी लीहीत
ना कुणा दु:ख मी नसण्याचं,ना कुणा आनंद मी असण्याचा,
सरावच झालाय जणू मला, मनी कुढत जगण्याचा.
एकट एकट हे माझं जग,अन होणारी जीवाची जगमग,
कुणालातरी उमजेल का?वेड मन माझं कुणालातरी समजेल का?
एकटेपणाला माझ्या कोणी घेईल का आपल्या हाती?
सोडवूनी ही कोडी सारी, बनेल का तो माझा 'जीवनसाथी'
Rupa..