अजूनही डोळ्यात आठवणींचा कल्लोळ होतो,
अन् त्यातील अश्रू सैरवैर होतो.
आठवणींना सावरता अन् विसरता मन भरून येते,
तितक्यातच डोळ्यातील धरण ओथम्बुन वाहतो.
रस्त्यातून चालताना तुझया सावालीची आठवण होते,
कधी अंधार सावरून उन पडावे, याचीच वाट बघत असते.
पावसात तिच्या पैंजणांचा सरिंसारखा आवाज येतो,
हरपून जावे इतका सुंदर सूर तयार होतो.
तोच या आठवणींचा कल्लोळ प्रत्येक ऋतुत अन् क्षणात दिसतो,
असाच डोळ्यात आठवणींचा कल्लोळ होतो.