तुझ्या आसवांचा गंधच मला कळत नाही,
आठवण आल्याशिवाय मनच माझे वळत नाही.
पाहिल्यावर वाटते,
तू आहेस आयुष्यात कुठेतरी,
आपल्या प्रेमाची पाऊलवाट दिसेलच तुला कधीतरी.
रोज एक पाऊल तुझ्यापासून दूर जाते.
पण तिसरी कडे जाते,
असे मनच माझे मला खाते.
दाही दिशांवर अंधार असा पडलेला.
अन अंधारात
माझ्या अस्तित्वाचा पाऊस हा दाटलेला.
आपल्या अपघाताचा छंदच कळला नाही,
भावनेचा तो रंगच वळला नाही.
अन का कोण जाणे,
तुझ्या आसवांचा गंधच मला कळत नाही,
आठवण आल्याशिवाय मनच माझे वळत नाही.
वैशाली .....................