कधी न येइ ओठी माझ्या नाव तुझे
पण डोळ्यांमधल्या उदास हाका तुझ्याचसाठी
वादळातही खचे न ज्याचा धीर कधीही
पण बुडते माझे जहाज येऊन तुझ्याच काठी.
कुठेतरी मग भरकटलेला वणवणणारा प्रवास होतो.
तुझी आठवण येते तेव्हा तुझी शपथ मी उदास होतो.II
दिसूनही मी दिसलो नाही जवळ तुझ्या मी होतो इतका
बघूनही तू नजर फ़सावी असा तुझ्या आसपास होतो.
तुझी आठवण्....
धीर समजलो ज्या हाकेला केवळ तो आवाज निघाला
सदैव स्वप्ने बघणाऱ्याचा असाच का भ्रमनिरास होतो..
तुझी आठवण...
रात्र काल एकटीच होती चांद तिला भेटलाच नाही
हाय.. या साध्या विरहाचा त्रास कीती पण दवांस होतो....
तुझी आठवण.....
-chandrashekhar saanekar