Author Topic: तेव्हा कसे वाटते ?  (Read 1437 times)

anolakhi

 • Guest
तेव्हा कसे वाटते ?
« on: January 03, 2010, 06:37:15 PM »
 तेव्हा कसे वाटते ?

आयुष्याभर पुरेल असे कोडे जेव्हा कोणी,
नकळतच तुम्हाला देऊन जाते,
खर सांगा तुम्हाला "तेव्हा  कसे वाटते?"

स्वतहालाही हरवून बसू अश्या  गर्दीत शिरूनही,
पदो-पदी एकच  व्यक्ती  जेव्हा समोर येते,
खर सांगा तुम्हाला "तेव्हा  कसे वाटते?"

माळरानावर रात्रभर एका खडकाला गोंजारूनही,
थंडीच्या पहाटे स्वतः दंवाने ओले होऊनहि,जेव्हा खडकला  नाही पाझर फुटते,
खर सांगा तुम्हाला "तेव्हा  कसे वाटते?"

कोणी आपले मन संपूर्णपने आपल्या समोर रिकामे करूनही,
त्यात आपण यथकिंचीतही नाही सापडत,
खर सांगा तुम्हाला "तेव्हा  कसे वाटते?"

स्वतःपाशी जराही न उरून,
कोणी आपल्याला पाहूनही दुरून,
नजर चुकवते,
खर सांगा तुम्हाला "तेव्हा  कसे वाटते?"


Marathi Kavita : मराठी कविता


Offline TJS

 • Newbie
 • *
 • Posts: 4
Re: तेव्हा कसे वाटते ?
« Reply #1 on: January 05, 2010, 12:14:08 PM »


Kupach chaan......

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: तेव्हा कसे वाटते ?
« Reply #2 on: January 05, 2010, 01:39:36 PM »
ok

Offline nirmala.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 392
 • Gender: Female
 • nirmala.
Re: तेव्हा कसे वाटते ?
« Reply #3 on: January 05, 2010, 05:06:43 PM »
आयुष्याभर पुरेल असे कोडे जेव्हा कोणी,
नकळतच तुम्हाला देऊन जाते,too goood :)

Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: तेव्हा कसे वाटते ?
« Reply #4 on: January 06, 2010, 05:11:57 PM »
आयुष्याभर पुरेल असे कोडे जेव्हा कोणी,
नकळतच तुम्हाला देऊन जाते,
खर सांगा तुम्हाला "तेव्हा  कसे वाटते?"

khupach chan.....