Author Topic: कोणी नाही...  (Read 1402 times)

anolakhi

 • Guest
कोणी नाही...
« on: January 09, 2010, 07:32:11 PM »
नजर टाकून पाहिली दूरवर  ,
पण दिशा रिकाम्या,दूरवर कोणी नाही...

माळरानही झाले आता सैरभैर ,
वारा झोंबत आहे  ,लक्ख झाला उजेड,
पण पणतीला विजन्याची  जाग नाही.....

आता ना उरले कुंपण,
ना उरले कुंपणाचे अंगण,
घराबाहेर नजर टाकली तर तुळशीला दिवा लावायलाही कोणीच नाही....

सांजही अलीकडे वेड्यागत वागते,
राहून-राहून जुन्या आठवणी मांगते,
पण आत्तातर माझ्याकडे आठवणीही नाही....

वाटा वळण घेतात चुकीच्या,
पण पायांना कोण समजावेल,
जिथे त्याना जायचे आहे तिथे त्यांचे कोणीच नाही....

नजर टाकून पाहिली दूरवर  ,
पण दिशा रिकाम्या,दूरवर कोणी नाही...

                                                          अनोळखी ... 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: कोणी नाही...
« Reply #1 on: January 14, 2010, 12:06:17 AM »
chhan ahe  :(

नजर टाकून पाहिली दूरवर,
पण दिशा रिकाम्या, दूरवर कोणी नाही...

Offline mannmajhe

 • Newbie
 • *
 • Posts: 10
Re: कोणी नाही...
« Reply #2 on: January 14, 2010, 01:15:00 PM »
khupach chaan !!!
« Last Edit: January 14, 2010, 04:46:37 PM by talktoanil »