अश्रु साक्षी आहेत तिच्या विरहाचे
तुकडेच उरले आहेत या मनाचे
आहे मी आता एकला
अर्थ नाही या जीवनाचे
वाटते असे एका धूळभेटीचे प्रेम होते आमचे
कान थकले ऐकून शब्द सांतवनाचे
गेली ती न विचार करता
दु:खात झाले रुपांतर सर्व सुखांचे
समजवले देऊन उदाहरण लैला मजुनेचे
दुर्लक्ष केले सांगून कारण मजबुरीचे
ऐकून तिचे सर्व बहाने
डोळे मिटून पाहिले क्षण पूर्वीचे
+++++++++++ गौरव +++++++++++