एका कातरवेळी............
सूर्य नभाआड लापनारच होता.
पुन्हा भेटू अस आशवसन धरतीला देत होता
ओल्या डोळ्यांनी ती त्याला नयनात सठवत होती.
मिळेल तो क्षण भरपूर जगत होती
तिला माहित होतं दाहक तो आहे
त्याचा सहवास तर त्याहून दाहक आहे
पण प्रेमात ती अधीर झाली होती
सांज होताच तो जाणार म्हणून
जीवाची तिच्या घालमेल होत होती
शेवटी तो जाणारच होता
तिला दुरावा सहन नाही होत म्हणून
तो थांबणार थोडीच होता
याचा अर्थ असा नाही कि तो दुखावला नव्हता
म्हणूनच त्याचा वेग थोडा मंदावला होता
रात्र झाली अंधार साचला होता
ती वेडी त्याची वाट पाहत होती
चंद्र आणि रात्रीच प्रेमं पाहून झुरत होती
सकाळ झाली
तो आला
हळूच डोकावला पाहतो तर काय
तिच्या अश्रूंचा सडा शिंपला होता
ती स्वत तिच्या अश्रुनी(दवबिंदू) चिंब होती
तो आला ती हसली
पुन्हा कधी जाणार नाही या वाचनावर
प्रीत त्यांची फुलली
सांजेचे वेध लागले
तिच्या काळजात धस्स झाले
ती कातील कातरवेळ पुन्हा आली होती
आणि नाईलाजाने का होईना
प्रीत पुन्हा उद्याची वाट पाहणार होती....
तिच्या मनातला अंधार बहेर सांडला होता
रागाऊन चिडून ती देवाला विचारात होती
रोजच असा दुरावा तर पहिली भेट झालीच का होती..............?
दीप्ती..