सकाळच्या दवामुळे अंग माझे चिंब झाले
सखे तुझ्या सोबतचे क्षण मनात रंगले
आठवावे क्षण ते किती
ओंजळ प्रेमाने भरली
आता क्षणा क्षणांची गं
गोळा बेरीज शून्य झाली ...
मन अंगणात फुले
गुलमोहर तो सारा
आता फक्त उरला गं
आठवणींचा पसारा
सखे तुझ्या सोबती गं
काटे सुद्धा फुले वाटे
अन तुझ्या विरहाने
फुले सुद्धा मला बोचे
सखे तुझ्या सोबती गं
मला जगणे मान्य होते
अन तुझ्या विरहाने
मला मरणे भाग होते....
अन तुझ्या विरहाने
मला मरणे भाग होते.......
.......... दिनेश