उभा मी एकटा,
पाहतो एकटक,
रोखुनी नजर,
…… तुझ्या येण्याच्या दिशेला.
विचारलं वारयाला,
चमचमत्या विजेला,
माहिती विचारली तुझी,
…… ढगाळलेल्या आकाशाला.
अगतिक उभाच मी,
त्याच वाटेवरती होतो,
पण मन मात्र केव्हाच,
…… गेले तुझ्या शोधाला.
दिन सारून गेला,
सांज ढळत आली,
तुझी चाहूल ना झाली,
…… सुरुवात झाली निशेला.
डोळे थकले होते,
मन हि थकले होते,
श्वास फक्त होते,
…… गरज म्हणून शरीराला.
समजावले मी भाबड्या मनाला,
झुळूक वारयाची ती होती,
विसरून जा सारं,
…… नको गुंतवू जिवाला.
.अमोल