दोन फुले
आजही आहेत कोमेजलेली, सुगंध उडुनी गेलेली
दोन फुले तुला द्यायला आणलेली
आलीच नाहीस तू त्या दिवशी
माझीच असूनही का तू वाटलीस परकी
आजही आहेत कोमेजलेली, सुगंध उडुनी गेलेली
दोन फुले तुला द्यायला आणलेली
जराही भुरळ पडली नाही तुला
सोबत आल्या गेल्या क्षणाची
राखरांगोळी केलीस तू आपल्या प्रेमाची
आजही आहेत कोमेजलेली, सुगंध उडुनी गेलेली
दोन फुले तुला द्यायला आणलेली
तरीही वाट पाहतो आहे मी
तरीही वाट पाहतो आहे मी....कारण,
जगण्याची आणि तुझ्यावर निरंतर प्रेम करण्याची प्रेरणा मला देतात,
दोन फुले तुला द्यायला आणलेली,
आजही आहेत कोमेजलेली, सुगंध उडुनी गेलीली
दोन फुले तुला द्यायला आणलेली
सुगंध आणि दरवळ त्यांचा आजही मनात आहे
कारण फार प्रेमाने होती मी ती फुले आणलेली
आजही आहेत कोमेजलेली सुंगंध उडुनी गेलेली
दोन फुले तुला द्यायला आणलेली....
दोन फुले तुला द्यायला आणलेली....
तुला द्यायला आणलेली....
तुला द्यायला आणलेली....
तुला द्यायला आणलेली दोन फुले....
युगान्तीक.......