अंतरीचे सूर
अंतरीचे सूर माझे लांब माळरानावर नेतात
अविस्मरणीय स्मृती तिच्या मला तिथे गाठतात......
सल्सलणारा वारा गंध तीच देवून जातो
मग मी कुठे तरी तिच्या आठवणीच्या मागे भटकत राहतो
तिचे बोलणे तिचे हसणे तिचे लाजणे
सारे क्षण नजरे समोर येतात......
अंतरीचे सूर माझे लांब माळरानावर नेतात
तिचा तो हवाहवासा वाटणारा सहवास
अन नितळ काया
शब्दानाही भुरळ पडेल
अशी तिच्या सौन्दार्यची माया
शब्द मग नंतर आपोआपच ओठी येतात
सुंदर अलुन्कृत शब्दांचा नजराणा देवून जातात
अंतरीचे सूर माझे लांब माळराना वर नेतात
अंतरीचे सूर माझे लांब माळराना वर नेतात
लांब माळराना वर नेतात.....
युगान्तीक....