प्रतीक्षा
असह्य उकाडा हि देखील
तुझ्या येण्याचीच खून
असे कळल्या पासून
त्याचीही प्रतीक्षाच आहे
तू आलीस कि धुडगूस
विस्कटणे ठरलेले
तरी प्रतीक्षा संपत नाही
काळीज फाकून फाकून जाते
झाकून दुख ठेवू किती
नाती किती तोडून टाकू
दुख समोर वाकू किती.....
(इंद्रजीत भालेराव.)