तू माग असे काही,
जे देता देता अवघे जगणे संपून जाई
तू माग असे काही, तू माग असे काही
हे कसे कळावे तुला
किती श्वास दिले तू मला
हे श्वास झुलाविती माझ्या
आयुष्याच्या झुला
जे पुरून आयुष्याला उरून मागे राही
तू माग असे काही तू माग असे काही
अन्कुरास जैसे माती
अन किरणांसाठी ज्योती
तू माझ्यासाठी ऐसी उदार घन्मात होती
जे मागणे हि माझासाठी ऋण बनून जन्म राही
तू मग असे काही तू मग असे काही
हा श्रावण असतो जेथे
वैशाख हि असतो तेथे
पालवी का कधी कोठे
पाचोल्यावीन फुटते
हा पाचोळा मी होतो
तू ल्याया ती हिरवाई
तू माग असे काही
तू माग मज काही.....
(कमलेश कुलकर्णी.)