सूर विरून गेला गीत थाम्बले मागे
पानापानातून आता काळोख हुन्दका दाटे
चन्द्र होता भरात लाजते पौर्णिमा
मुखावर तुझ्या अबोल मुग्ध लालिमा
चान्दण्याना छेडून सूर मी जागले
पानापानातून आता काळोख हुन्दका दाटे
शब्दावाचून कळले सारे भाव त्या अन्तरीचे
तुझ्या नी माझ्यात आता अन्तर ग क्षितिजाचे
थाम्बले अश्रू मूक वेदना उफाळे
पानापानातून आता काळोख हुन्दका दाटे
मावळे तो चन्द्रमा विरही मी जाहलो
चान्दण्याही सोडून जाती एकटाच उरलो
विराण आता वाळवन्ट हे ह्रुदयाचे
पानापानातून आता काळोख हुन्दका दाटे
Unknown