नाही, मी तुला कधीच नाही दाखवणार
माझ भन्गलेल ह्रुदय आणी सलणारी जखम
माझ दु:ख मी भोगून घेतलय आणी मला माहितीये
कश्या लपवायच्या माझ्या वेदना
मी मुसळधार पावसाचा सहारा घेइन ना
मी वाट बघीन कडकडणार्या विजान्ची
तुला कधीच नाही समजणार माझ्या डोळ्यातला पाउस
तुला नाहीच कळणार की मी अजून वेडी आहे तुझ्यासाठी
ते फक्त माहीत असेल माझ्या श्वासाना
मी मुसळधार पावसाचा सहारा घेइन ना
आकाशातून पडणार्या अगणीत पर्जन्यधारा
पुसु नाही शकणार तुझ्या आठवणी
आणी आता आपण बरोबर नाहिये तर
मी प्रार्थना करतीये रोरावणार्या वादळाची
जे लपवून टाकेल माझ्या अश्रूना
मी मुसळधार पावसाचा सहारा घेइन ना
आणी
जेव्हा होइल माझ रडून मनसोक्त
मी पान्घरीन मुखवटा हसरेपणाचा
आणी चालीन तळपत्या सूर्यप्रकाशात
कदाचीत मी मुर्ख असेनही,
तरीही सख्या
तुला शेवटपर्यन्त नाहीच कळणार माझ्या वेदना
मी मुसळधार पावसाचा सहारा घेइन ना
unknown