Author Topic: माझी तू....  (Read 1368 times)

anolakhi

 • Guest
माझी तू....
« on: February 12, 2010, 04:34:20 PM »
तुझ्या सोबत येणारी प्रत्येक पहाट पाहतो,
सोबत तुझ्याच हर एक रात्र जागवतो...

जश्या तुझ्या सोबत गप्पा रंगतात,
तश्याच तू नसतानाही तुझ्या आठवणी माझ्या सोबत असतात....

तुझे हसणे,तुझे रुसणे,
चेहऱ्यावरले तुझे भाव सारे, माझे डोळे टिपतात,
आणि तुझ्या माघारी तेच माझी खरी साथ देतात...

तास्-न-तास् तुझ्या तसविरीला न्याहाळतो,
तरी डोळ्यात तुझ्या रोज नवा रंग सापडतो...

तशी तू तसविरीतून बाहेरहि येतेस,
मी पाहिलेली स्वप्ने माझ्या सोबत जागवतेस...

कधी हसताना , कधी रडताना,तर कधी मी श्वास घेताना,
तू स्वताहाला माझ्यात हरवतेस,
मी रात्री स्वप्ने पहाताना......

-----------------------------------------------------------------------

माझ्या मनात तुझ्या आठवणींच्या जत्रे भरतात,
तरी आठवणी तुझ्या शिवाय एकट्याच भासतात..

कधी आठवणी सोबत तुही माझ्या मनात ये,
आणि पहा माझ्या रात्री तुझ्या आठवणीन सोबत कश्या जागतात,
तरी आठवणी तुझ्या शिवाय एकट्याच भासतात..

-----------------------------------------------------------------------


जीवनात माझ्या अशी आलीस,
कळलेच नाही कधी जीवनच झालीस...
तुझे हसणे,तुझे रुसणे,
तुझे कधी असणे, अन कधी नसणे,
यांवरच शब्द लिहिले,
आणि कळलेच नाही कधी शब्दांची कविता झाली...

                   अनोळखी....
« Last Edit: February 12, 2010, 04:35:16 PM by anolakhi »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline nirmala.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 392
 • Gender: Female
 • nirmala.
Re: माझी तू....
« Reply #1 on: February 12, 2010, 04:42:39 PM »
nice :)

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: माझी तू....
« Reply #2 on: February 12, 2010, 10:03:11 PM »
tu anolkhi aslas tari tuzhe shabda olkhiche vatatat

so nice poem..........