अजून माझे गीत अपुरे
अजून सूर बेसूर लागे
तुझ्या नसण्याने सखया
शब्द मज सोडून गेले
कातरवेळ ही हुरहुरणारी
दशदिशात रन्ग पसरले
तुझ्यावीण परी प्रिया
गाणे माझे विरून गेले
प्रत्येक माझ्या कवितेला
कोन्दण तुझ्या रे प्रीतिचे
सुन्या सुन्या मैफ़ीलीत माझ्या
आळवीते गाणे तुझ्या विरहाचे
Unknown