वाटल होत उरलेल थोड चान्दण
तुझ्या ओन्जळीत भरीन
पण
तुझी आवस कधी सम्पलीच नाही
वाटल होत टपोरे पावसाचे मोती
तुझ्या लाम्ब केसात माळीन
पण
तुझा उन्हाळा कधी शमलाच नाही
वाटल होत गोड गुलाबी ठन्डीत
तुला धुक्याचा साज घालीन
पण
तुझी पहाट कधी उगवलीच नाही
वाटल होत विझत्या स्पन्दनातला
एक श्वास तुझ्याबरोबर घेईन
पण
माझ्या हृदयाची साद तु कधी ऐकलीच नाहीस
Unknown