Author Topic: बघ सखे वाटलंच कधी तर ये परत.  (Read 544 times)

Offline Dnyaneshwar Musale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
  • Gender: Male
माथ्यावरती आठ्या लागल्यात
उमटायला,
आता वय चाललंय सरत
बघ सखे वाटलंच तुला काही तर ये कधी परत.....

आठवतयं
तेव्हा दोघांमधी एक घास
पुरायचा,
आता
तूच सांग 
एकट्यालाच अख्खा कसा जिरायचा.
आग्रह तर मी नाहीच करत,
पण
बघ वाटलंच कधी तर
एखादा घास भरवायला ये परत.....

तुला हसताना बघुन
एकदा मी ही हसलो होतो.
त्याच दिवशी आरश्यासमोर
उभा राहुन
मी ही आरश्यावर रुसलो होतो,
सरळ पावडरचा डबा तोंडाला फासून
मी ही हिरो सारखा दिसलो होतो,
पण तुझ्याकडे वेळ होताच कुठे
माझ्याकडे बघायला,
खर तर तुझं पहिल्यांदा पाहिलेलं ते हसु
आजपर्यंत पुरेस होत मला जगायला,
आता तुझ्याकडे
वेळ असलाच तर
ये कधी चहाच्या टपरीवर फिरत,
पिऊया ग्लास दोन ग्लास पावसाचं पाणी पुन्हा एकदा परत....

माफ कर
पण तुझं ऐकून
मी अजुन जराही बदललो नाहीच
तोच मळका सदरा, लांब लांब केसं
तशीच आहेत,
त्यांनाही वळणच नाही काही राहिलं,
मी फक्त शोधत राहिलो  तुला
पण समजलचं नाही
तुझ्यातला मी कधी एकटा झाला,
आता झालं गेलं सारं विसरून जा,
अनं
ये काठीचा आधार धरत,
दुसरं काही नाही
सरलेल्या दिसांवर निवांत बोलूया परत.....


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास वजा दहा किती ? (answer in English number):