किती छान बाबा दिला तू
कसे मी तूला सांगू
त्यासाठी बाप्पा तूला
लाख लाख थँक्यू
~ऒफ़िसात तो जातो
कित्ती काम करतो
रात्री मग येतो
आणि माझ्याशी खेळतो
मझ्यामागे धावतो
गम्मत माझी करतो
मला रुसलेला बघून
खुद्कन हसतो
दूर गावी जातो
पण रोज फोन करतो
कशी आहे छ्कूली
असं लाडात विचारतो
किती छान बाबा दिला तू
कसे मी तूला सांगू
त्यासाठी बाप्पा तूला
लाख लाख थँक्यू
ऊन्हा-तान्हाचा माझा बाबा
राब राब राबतो
थकलेला बाबा रात्री
उशाशी माझ्या बसतो
झोपलेल्या मला
प्रेमाने तो बघतो
डोक्यावर हात ठेवून
खूप मोठी हो म्हणतो
बरं नसलं मला की
रात्र रात्र जागतो
माझ्या भविष्याची
चिंता सतत करतो
किती छान बाबा दिला तू
कसे मी तूला सांगू
त्यासाठी बाप्पा तूला
लाख लाख थँक्यू
आज माझा बाबा
आनंदी दिसतो
ही माझी मुलगी
असे गर्वाने सांगतो
मी मुळूमुळू रडताना
माझी समजूत काढ्णारा बाबा
मलाच आज दूर पाठवून
कसा रडतोय बघा
किती छान बाबा दिला तू
कसे मी तूला सांगू
त्यासाठी बाप्पा तूला
लाख लाख थँक्यू
श्वेता देव...