पक्षी होऊनी ऊड्ण्या मन हे सरसावले
नवा गंध हा हूंगण्या मन हे वेडावले
वार्यावरती झूलण्या मन हे झेपावले
कूणास बघूनी मग हे इथेच थबकले
मनात माझ्या अलगद कोण हे शिरले
मनाचा माझ्या ताबा घेऊनी हसत बसले
आता माझे मन माझे न राहिले
कुणास भुलूनी हे स्वत:शीच हरले
करु नये तीच चूक या मनाने केली
स्वत:चे अस्तित्व विसरुन त्याच्या सुखाची चिंता केली
आनंदात त्याच्या स्वत:चे हास्य शोधले
त्यानं दिलेले अश्रु त्या हसण्यातच लपवले
या मनानं न जाणो त्याला
किती हसवले अन् किती रडवले
पण त्याने हास्य तेवढे अलगद् टिपले
अन् अश्रु ते सोडून दिले
माझे मन वेडे ते वेडेच ठरले
हे अश्रुच त्याने अलगद् झेलले
आठवणीत त्याच्या
एकटेच झुरले
श्वेता देव...