मन ओतले समोरी तुझ्या,तुझी ओंझळहि खुलली पण उशिरा उशिरा,
सताड खुले माझे मन पाझरले थेंब दोन,तू पुसलेहि डोळे पण उशिरा उशिरा....
एकले तू सारे,मन माझे कळलेही तुज ,पण उशिरा उशिरा,
बेभान स्वप्ने माझी,हरवलेली सूद, आले भानावर, पण उशिरा उशिरा....
आता राती सोबती,चंद्रही जागा राही,निजतात डोळे,आठवणी जाग्या राही,उशिरा उशिरा,
नभी तांबड फुलते,राती वाट हरवलेले पाखरू पुन्हा घर शोधी, दिशा फसव्या,पण सोबतीही त्याच,
वाट सापडे,पण घरटे हरवी,का होते सारे काही,उशिरा उशिरा....
अनोळखी
inspired by
उशीरा उशीरा... by संदीप खरे