Author Topic: जमलच नाही  (Read 3551 times)

Offline marathi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 212
जमलच नाही
« on: February 15, 2009, 07:43:46 PM »
=================================
जगाकडे बघून जगताना ,
असे दिवस , रात्री पळताना .
तुझ्याकडे कधी लक्ष द्यायला जमलच नाही
गालावरल्या रंगाचा अर्थ...
मिठितिल स्पर्शाचा अर्थ....
रुसवे फुगव्यातील अर्थ ....
डोळ्यातील भावांचा अर्थ ....
समजायला वेळच मिळाला नाही .....
खरच प्रेम व्यक्त करण कधी जमलच नाही .
उभे केले जीने, चालायला शिकवले .....
एक घास चिउचा म्हणत बळ बळ भरविले...
जेव्हा गरज होती तिला माझी, तेव्हा ......
तिच्यासाठी वेळ द्यायला जमलच नाही .....
श्वाश म्हणायचा मी ज्यांना ,
ज्यांच्यात स्वताला मी शोधायचो .....
त्यांच्या साठीच सारे लढने ,
स्वताच स्वताला फसवायचो.....
त्याना उमलताना पहायला जमलच नाही
आज विचार करतोय ,.
अखेरचा दिवा मालवताना...
भरलेले डोळे पुसताना....
आणि जिवंत जळताना ..
खरच एकही नाटक आपल्याला जमलच नाही ....
धावलो आपण खुप पण,
कश्यासाठी तेच कळले नाही....
================================
सुगंध
================================

please post your comments.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline nirmala.

  • Jr. Member
  • **
  • Posts: 385
  • Gender: Female
  • nirmala.
Re: जमलच नाही
« Reply #1 on: December 18, 2009, 12:39:11 PM »
khup sundar......
shewatchya don oli kharach khup touchiiiing aahet....
i like it...... :)

-Sanchit nalawade

  • Guest
Re: जमलच नाही
« Reply #2 on: December 07, 2017, 06:44:32 PM »
Khupach chann

Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 522
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: जमलच नाही
« Reply #3 on: December 16, 2017, 04:07:25 PM »
khup chan..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास गुणिले पाच किती ? (answer in English):