पहिला पाउस, पहिली आठवण,
पहिले प्रेम, पहिले भांडण,
पहिल्यांदाच तुझे रुसने, अन् माझे समजावने,
समजावताना तुझे ते लाजने, हसणे
ह्या सगळ्या गोष्टी आज आठवतात
कारण आज तोच दिवस आहे, तोच पाउस आहे.
पण ह्या पाउसात काही कमी आहे......
ह्या....., ह्या पाउसात फक्त तुझी कमी आहे.
तुझे ते पाउसात भिजने, आजही मला आठवते
लहान मुलांप्रमाणे पाउस पाहताच तू बावरतेस
तुझ्यासमवेत चंद्र चिंब भिजताना सगळी दु:ख हरवतात
मनातल्या प्रेमभावना जश्या झंकारून येतात.
विरहाच्या कडक उन्हाळ्यात आज मी उभा आहे
पण तुझ्या आठवणी चा गारवा अजुन ही माझ्या मनात आहे
तू परत येशील, तुझी वाट मी पाहत आहे,
तू येशील ह्याच आशेवर मी जगत आहे.
....अखिलेश
तुझ्या कवितेतील शुद्धलेखनाच्या काही चुका दुरुस्त करून दिल्या आहेत त्या बदल. कविता जर नीट मांडली नाही तर अर्थाचा अनर्थ होतो वाचताना ..... कविता छान आहे तुझी

...