========================
कोठे निघालिस ? का निघालिस ?
एक कारण तरी सांगून जा
नाही आडवणार तुला
पण संपताना मला पाहून जा.
मुक्त व्हायचे होते ना तुला.
मला तर पहिले सोडवून जा.
नाही आडवणार तुला.
पण दोन आश्रू ढाळून जा.
तुज्या साठीच प्राथना केल्यात सार्या
एकदा त्याना बघून जा.
काहीच नको मला आता
सारे काही घेऊन जा .
फक्त एकदाच खोटे
खोटे का होईना
पण प्रेम होते म्हणुन जा
========================
सुगंध
========================