Author Topic: रोज..  (Read 1589 times)

Offline anolakhi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 79
  • Gender: Male
    • http://www.durava.blogspot.com
रोज..
« on: March 21, 2010, 12:56:56 PM »
रोज सूर्य का मावळतो ?
रोज संध्याकाळ का होते ?
रोज मनी काळोख का दाटतो ?
का मला रोज तू आठवतेस.....?

का रोज मी तुझ्यात हरवतो ?
रोज मी परत तुझ्यातच का सापडतो ?
रोज रात्र तुझ्या सोबत का जागवतो ?
रोज पहाटे तला शोधात दिशा का चाचपडतो ?
रोज देवाकडे तुला का मागतो ?
रोज देव माझे सर्व काही एकूण घेतो ?
आणि तरीही का ऐकूनही मग न ऐकल्यासारखा वागतो ?

रोज दिवसभर भान हरपून मी वावरतो ?
रोज पुन्हा मी का सावरतो ?
मग रोज मी स्वतहाचीच समजूत का काढतो ?
आणि जेव्हा असे वाटते मनाला सारे पटले,
तेव्हा मग,
.
.
रोज सूर्य मावळतोच ,
रोज संध्याकाळ होतेच,
आणि मग मला तू आठवतेस.....रोज....

(अनोळखी)    निलेश...
« Last Edit: March 21, 2010, 05:34:59 PM by anolakhi »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,336
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: रोज..
« Reply #1 on: March 21, 2010, 02:25:51 PM »
छान आहे! आवडली :) .........

पण कवितेखाली नाव नाही दिलंस तुझं... लोकांना कसं कळणार ही तुझी कविता आहे की just copy paste ;) ......

आणि “रोज पहाटे तला शोधात दिशा का चाचपडतो?” या कडव्यात नक्की काय म्हणायचे आहे ते कळत नाही “तुला शोधत” की “तुझ्या शोधात”?
तसेच “रोज इवसाभर भान हरपून मी वावरतो?” ह्यात “इवसाभर” म्हणजे नक्की काय? मी पहिल्यांदाच ऐकतेय हा शब्द म्हणून विचारतेय ............. “दिवसभर” असे आहे का ते? ........
“स्वतहाचीच” च्या ऐवजी “स्वत:चीच” हा शब्द वापर ............

बाकी मस्त जमली आहे कविता ....... कालच तुझ्या २-३ कविता वाचण्यात आल्या होत्या ......... मस्त होत्या त्याही ........ आणि हा जमलं तर अनोळखी ऐवजी तुझे स्वत:चे खरे नाव दे ....  :)

Offline anolakhi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 79
  • Gender: Male
    • http://www.durava.blogspot.com
Re: रोज..
« Reply #2 on: March 21, 2010, 05:36:34 PM »
आपल्या मोल्यवान सल्ल्या साठी धन्यवाद ......

Offline gaurig

  • Full Member
  • ***
  • Posts: 983
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: रोज..
« Reply #3 on: March 22, 2010, 02:22:22 PM »
chanach jamali aahe kavita.......keep it up...... :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):