Author Topic: नसतेस तू जेव्हा कधी.....  (Read 1966 times)

Offline dinesh.belsare

 • Newbie
 • *
 • Posts: 37
 • Gender: Male
 • शब्द हा बाणा प्रमाणे तिक्ष्ण असतो.....
नसतेस तू जेव्हा कधी.....
« on: March 25, 2010, 03:58:19 AM »
माती गंध पहिल्या सरींचा
सुखावून मज सोडतो
एक चंद्रमा नभीचा
तुझ सारखा मज भासतो

लाजणे अन हासणे
जीव घेण्या अदा तुझ्या
आता, अजूनही या क्षणाला
भाव, प्रीतीचे मी पाहतो

इथे, तिथे, त्या पलीकडे
कुठे, कुठे, तू तूच आहे
स्वप्नी, मनी अन अंतरी
प्रेम झरा तो वाहतो

शोध तुजला असेल माझा
नसण्यात माझ्या मी जाणतो
नसतेस तू जेव्हा कधी
अश्रू पापण्या मद्धे झाकतो
                                 ......दिनेश......
« Last Edit: March 26, 2010, 03:16:52 AM by dinesh.belsare »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: नसतेस तू जेव्हा कधी.....
« Reply #1 on: April 26, 2011, 05:42:46 PM »
chhan ahe .........