जे तुला पहायचे होते
ते दाखवायला जमले नाही
ह्याच आज ही वाईट वाटतय
जे मी प्रमाणिक पणे दाखविले
ते तुला पहावले नाही
दुःख ते सलतय
जे तुला बोलायचे होते
ते माझ्या पर्यंत पोहचले नाही
जे मी बोललो ते
तु एकलेच नाही
खुपदा आसे घडलय
जे तुला हवे होते
ते मला देता आले नाही
जे मला हवे होते ते
तुझ्याकडून कधीच मिळाले नाही
शोधतच राहिलो दोघे ही आपण
पण हाती काही ही सापडले नाही
आणि जे सापडले ते स्वीकारले
म्हनुनच आज ही एकत्र
यशस्वी आमृत मोहस्तव साजरा करतोय आपण
==========================
ღ ღसुगंधღ ღ 6/1/09
==========================