तू चालत रहा,पुढे पहात रहा....
मान वळवू नकोस,शेजारून तुझ्या जाताना मला ओळखू नकोस....
सावली बनून कधी तरी,तुझ्या अंगावर करेन भिर-भिर,
झाडाची समझून, सहज दुर्लक्ष कर,
एखादे पान उन्मळून पडले तुझ्या पायी तर,
कोठून पडले हे पाहण्या साठी तरी मान वर कर,
पण सावलीसाठी तरी कधीतरी त्या झाडाच्या वाटेवरून जात रहा ,
मग भले कोणती जुनी आठवण आठवू नकोस,
तू चालत रहा,पुढे पहात रहा...
मान वळवू नकोस,शेजारून तुझ्या जाताना मला ओळखू नकोस....
तुझ्या मनाच्या दारातून वाराबनून निघून गेलोय,
सोबत घेऊन गेलोय सारा ओलावा,
आणि माझ्या डोळ्यात साठवून ठेवलाय हा ओलावा,
जर तुझ्या मनी कोरड पडली,आणि जरा ओलावा हावा-हवा वाटला तर,
नभा कडे चेहरा फिरव,
चेहऱ्यावर दोन थेंब बरसतील ,पावसाचे,माझ्या डोळ्यात साठवलेल्या आठवणींचे,
थांब पुसू नकोस त्यांचे अस्तित्व,वाफ होऊन उडून जातील हवेत,
जाताना त्याना त्याना तुझा स्पर्श सोबत घेऊन जाउंदे,
मग भले परत त्याना आठवू नकोस,
तू चालत रहा,पुढे पहात रहा...
मान वळवू नकोस,शेजारून तुझ्या जाताना मला ओळखू नकोस....
अनोळखी(निलेश)