माझे काय चुकले
नाही जमले फुकटाचे खायला
नाही जमले आन्याय पाहायला
सरसावल्या बाह्या पुढे झालो
माझे काय चुकले
भ्रस्टाचाराचे पेव फुटले
जिकडे तिकडे तण माजले
गोर गरिबांचे जगच लुटले
वळल्या मुठी पुढे झालो
माझे काय चुकले
असत्या पुढे सत्याने हात टेकले
पैसे फेकून सावकाराने शेत लुटले
फास घेतला शेतकर्याने कर्ज ना फिटले
घरदार त्यांचे उघड्यावर पडले
घेतल्या काठ्या पुढे झालो माझे काय चुकले
====================
ღ ღसुगंधღ ღ