मेल्याहून हि मी, मेलो आहे आज..
पुरून हि मी, उरलो आहे आज..
का जाणीव नसे कोणा, माझ्या दशेची..
जिवंतच चितेवर, जळलो आहे आज..
तमा न केली, दु:खाची कधीही..
तरीही आसंवात, पार बुडलो आहे आज..
गणते का करावी, इथे सुख दु:खाची..
कोणा करावी तक्रार, एकटाच उरलो आहे आज..
_______________________________ राजेश काळे