पाउस
अचानक येते पावसाची सर
धावत दुकानच आडोसा गाठावा तर
पुढ्यातच ती उभी
आणि एका बाजूला पावसाच्या धारांचा पडदा
आणि दुसर्या बाजूला
टाळता येणार नाही इतक्या निकट ती
तरीही सोप्प होवून जात समोर जाण
अवचित भेटल्यामुळे
दृष्टी होते धूसर
वाटत असेल पावसामुळे,
अशक्यच दुसर काही ऐकू येन
पावसाच्या आवाजात
तरीही बोलतो आम्ही
समजून घेतो अंदाजान
एकमेकांच बोलन
मी बोलतो अचानक आलेल्या पावसा बद्दल
हातातल्या बांगड्या पुढे मागे करत
आणि मग अचानक ती विचारते
माझ्या डोळ्यात पाहत
लग्न का केल नाहीस ?
मी चमकतो....
ती खरच असे काही बोलली
कि मलाच ऐकू येतंय पावसामुळ
पण मग म्हणतो हळूच
मी उगाच हसून
आता विचारतो, तू करशील ?
खाली झुकते तिची नजर
कस शक्य आहे आता ते....
मग मी म्हणतो,
तेही खरच
मग म्हणते...
हल्ली लिहित नाहीस ?
खंत वाटते ...
मी म्हणतो,
तू त्याचे कारण नाहीस....
ती चमकून बघते माझ्याकडे
माझ्या स्थिर नजरेचा वेध घेउ पाहते
आली तेवढ्या झपाट्याने पावसाची सर थांबते
बोलणे हि थांबते
आम्ही जायला निघतो
आपापल्या रस्त्यान
क्षणभर थांबून ती म्हणते
इतक्या वर्षांनी तरी
बरे झाले आपण भेटलो
मी म्हणतो
पाउस आला बर झाल
बघ न आभाळ मोकळ झाल....
(कवी - अनामिक.)