तुझ्या विचाराने मनाला वेगळाच आनंद मिळतो
स्वप्नांच्या दुनियेत प्रेमाचा एक गुलाब फुलतो
हृदयाला जसा एक सुखद धक्का बसतो
तू खूप आठवतेस जेव्हा आपण लांब असतो
फक्त तुझाच विचार करतो दिवस रात्र
का नाही तुझ्या बरोबर हा एकाच विचार मात्र
मन अस्वस्थ असतं जेव्हा जवळ तू नसतेस
डोळे पाणावतात जेव्हा जेव्हा तू लांब असतेस
हिवाळा संपला, वसंत ऋतू येऊन पोचलाय
तुझ्या एक महिन्याच्या प्रेमाला मन मुकलय
खूप प्रेम करतो तुझ्यावर अजून काय सांगू
चहूकडे आठवण तुझी, आता कुठे कुठे नको पाहू
आजकाल आपले डोळे भेटू शकत नाहीत आणी मनही
तरीही तुझ्याच विचारांनी हृदय धडकतोय अजूनही
कितीही लांब ही अंतरे भासतील
आपले हृदय नेहमी एकत्रच असतील
वेळ अवघड आहे पण संपेल लवकर
मग असीन मी नेहमीच तुझ्या बरोबर
सगळ कसं एक स्वप्नच वाटेल
फक्त तू मी आणि प्रेमाचा पाऊस असेल
याच आठवणीत मी रोज जगतोय
एक दिवस संपला यात मी खुश होतोय
हृदयाला जसा एक सुखद धक्का बसतो
तू खूप आठवतेस जेव्हा आपण लांब असतो
- शशांक