थोडयाच दिवसांत शिकलं माझं मन
दुखद फरक या मधला पण
हातात असलेल्या हाताचा
मनात गुंतलेल्या मनाचा
प्रत्येक प्रेमात आधार नसतो
प्रत्येक सोबतीत आपलेपणा नसतो
प्रेमाचे शब्द म्हणजे नसतं बंधन
तुटतात ते आणि तुटतात संबंध
समजायला लागलो मी, मनावरचं भार
प्रेमात झालेली माझी हार
तरी मान झुकली नाही की डोळे मिटले नाही
आयुष पुढे सरकवायचं ठरवलं मीही
ठरवलं वर्तमानातच जगायचं
भूतकाळात वळून नाही बघायचं
भाविष्कालाच्या विचाराचे नको झटके
आता नको अजून प्रेमातले फटके
खरं प्रेम तर होतं एकदाच
का शोधायचा दुसरं मग उगाच
जगू शकत नाही का मी एकटा
तिच्या परतीची वाट पाहता पाहता
तुझ्या प्रेमात राहून ही मी शिकलो
तुझ्या विरहात राहून ही मी शिकलो
हसायचं कसं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
जगायचं कसं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर..
- शशांक