तो तिच्या जवळ आला
आणी गप्प उभा राहिला
तिच्या बोटातली अंगठी पाहिली
आणी कापणाऱ्या हातानी ती काढली
सगळे त्याच्या कडेच बघत होते
आणी शब्द ओठांवरून फुटत नव्हते
त्याचे डोळे ही भरून आलेले
आणी मन आठवणीत हरवलेले
आठवण तिच्या बरोबर चालण्याची
हातात घेतलेल्या तिच्या हाताची
आठवण तिच्या बरोबर हसण्याची
दर रोज तिच्या प्रेमात पडण्याची
पण डोळे तिचे आता घट मिटलेत
हातातले हात ही सुटलेत
यापुढे ती त्याच्या जवळ नसणार
तिची कमी त्याला नेहमी भाशणार
सगळे अजून गप्पच उभे होते
डोळे त्याच्या पासून हटत नव्हते
तो वाकला नि तिच्या जवळ आला
'प्रेम करतो अजूनही', हळूच म्हणाला
न थांबली वेळ, न थांबलं जग
अग्नी तिला द्याला लागलीच मग
आता रडण्यात नाही काही फायदा
विचार करायला पाहिजे होता आधी थोडा
होतं त्या माणसा बरोबर असच,
काही विचार न करताच
जेव्हा एक मित्र दुसऱ्या मित्राला
देतो दारू पिऊन गाडी चालवायला
- शशांक