धुक्यात आलीस भल्या पहाटे
नक्षत्राचे झुम्बर घेउन
मिलनाच्या त्या संकेतावर
गेलीस हळूच फूली मारून
धुक्यात आलीस भल्या पहाटे
गालावर दवबिंदू घेउन
दवबिंदू मिठीत द्रवताना
का बारे गेलीस निमिष नयनातुन
धुक्यात आलीस भल्या पहाटे
स्वप्नाचा गजरा माळुन
स्वप्नांतिल तो गोड लालिमा
उधळत जातेस माझ्या कळ्यांतुन
धुक्यात आलिस भल्या पहाटे
प्रेमाचे अभिवचन घेउन
आट्यापाट्याच्या त्या खेळांत
आपण जातो का बरे गुंतुन
मग धुक्यात आलिस एके पहाटे
नयनी अश्रुंवर संयमाचा पहारा
मग घोघरया आवाजात स्त्रवतो
तो कातिल वेदनेचा निखारा
धुक्यात आलिस मग का.. पहाटे
उभ्या स्वप्नांच्या मग उध्वस्त धर्मशाळा
एकाटाच पारवा का घुमतो आहे
मग कापीत काळांच्या कातरवेळा...