पाहिले मी मलाच रडताना
एका कोप~यात ....फक्त तिच्या साठी..
काय घेवुन बसलोय मी हा पसारा ?
तिच्या आठवणींचा ...
वेडा होतो मी वेडा ..
कधी तरी मला भेटशील ..
कुठल्या तरी वळनावर ..
ह्याच आशेवर जगत होतो..
एकदाच भेटलो ,एकदाच पाहिलं
पण बोललो मात्र खुपदा ..
खुप वेळा सांगण्याचा प्रयत्न देखिल केला ..
पण निष्फळ..आणि हताश .
ह्रदय तुटले ग माझे त्याच वेळी .
तरीही पुन्हा पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला
आज तुझा निरोप कळला ..लग्न झाले ..
आणि
आणि
आणि पुन्हा वळलो कविते कड़े ..साहा~याच्या
आशेने ..नजर भिरकावली तिच्या कड़े
की तू तरी देशील सहारा ...
माझी कविता माझा सहारा झालीय आज ...
हेच सांगायचे होते...
कवी ..सूर्य