Author Topic: कधीतरी  (Read 1098 times)

Offline Prasad Chindarkar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 80
  • Gender: Male
कधीतरी
« on: June 30, 2010, 02:11:48 PM »
कधीतरी

अशीच तू होतीस कधीतरि
काय जाहले दुरावलो मी ,
परिचय होता ना ???....

तरीही का रुसले मग हसलेले
कळलेच कसे ना कांही ???...

अडले काय कुठे वा नडलेले ???...

भ्रम नव्हता हे मात्र खरे;
पण प्राण आज अवघडलेले........

अतिरेक सांडला मायेचा वेदना मांडली चुकलेली
छायेत सावली जशी भावना एक सुरात विखुरलेली.....

समर्पिले अवघे सारे हाती नच रेषहि उरलेली...
शून्यात कसे व्हावे रोपण संवेदना जिथे हरलेली ???

            ........................Author Unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,159
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: कधीतरी
« Reply #1 on: July 08, 2010, 10:57:29 AM »
समर्पिले अवघे सारे हाती नच रेषहि उरलेली...
शून्यात कसे व्हावे रोपण संवेदना जिथे हरलेली
 
chan.......