हारले रे मी पुन्हा
गुंतले तुझियात कारे ,गुंतल्या या भावना
शांत झाले गीत माझे ,शांत झाल्या वेदना
थिजली माझी गात्रे आता , थिजल्या सारया भावना
थिजले थिजले श्वास माझे , हारले रे मी पुन्हा
मुग्ध झाली लोचने हि ,त्यास का हे कळेना
प्रेम माझे साठलेले , जिवलगाला मिळेना
कविता बोडस