साठले हे अश्रू अवघे ,या दलांच्या कोंदणी
सांजवेळी दाटले मन ,त्या तुझ्या त्या आठवणी
साठले हे अश्रू अवघे ......
वाट बघते चांदराती , स्वप्न आहे लोचनी
लागते मग ओढ त्याची ,सुमन फुलले अंगणी
साठले हे अश्रू अवघे ......
संग त्याचा दंग झाले , मी पुन्हा रे बावरी
धुंद झाली हि धरा अन , धुंद झाले मी अशी
साठले हे अश्रू अवघे ......
कविता बोडस