बाटलीवर बाटली रिचवुनं
तिच्या आठवणींवर घालतोस पांघरून
थोडयावेळासाठी स्वताःला बचावतोस
पण मित्रा एक गोष्ट मात्र विसरतोस....
उद्या सकाळच्या सूर्या सोबत....
नशा उतरेल...पांघरून विरेल...
तिच्या आठवणींची भुतावळ
पुन्हा तुझ्याच भोवती जमेल...
तू पुन्हा बाटलीला घालतोस हात
पाहून भुतावळीचा नंगा नाच...
रिकामी बाटली लागता हाती
घरभर पसरती मग फुटके काचं...
काचेच्या प्रत्येक तुकड्यातून
तिचचं हसणं दिसतं तुला....
पूर्वी जीव ओवळुन टाकावासं वाटणारं
तिचं तेच हसणं.....
आज जीवघेणं वाटतं तुला....
तिची एक आठवण
एक पेग दारूचा...
तिची एक आठवण
एक कश सिगरेटचा...
अरे सोड हा खुळा नाद आता
हिशोब करत आहेस तू चुकीचा...
प्रेमभंग झालेल्या सर्वांनाच, या देवदासाने
बेवड्यांच्या category त आणुन सोडला आहे..
पण त्या वेड्याला नव्हतं माहिती बहुतेक की...
आठवणींची नशा ही कधीच न उतरणारी आहे.......
--पंकज सोनवणे....(स्वरचित)
०६-०१-२०१० (०३:०० म.पु.)