Author Topic: आठ्वणींच संग्रहालय  (Read 973 times)

Offline pankh09

 • Newbie
 • *
 • Posts: 41
आठ्वणींच संग्रहालय
« on: July 15, 2010, 10:39:54 AM »
1.

अजून देखील जपून ठेवलाय....
तू माळलेला तो गजरा....
जीर्ण झाली आहेत सगळी फुलं अगदी...
विरून गेलाय गुंफलेला दोरा ....
न आठवते निमित्त देण्याचे....
परत घेण्याचे ही स्मरत नाही...
पण श्वासा श्वासात उरला आहे ...
नसा नसात भिनला आहे ...
तुला जाऊन कित्येक वर्ष उलटली...
पण अजून ही पुरून उरला आहे.....
तू माळलेला तो गजरा....


2.

अजून देखील जपून ठेवला आहे...
तू जाताना दिलेला तो तुकडा कागदाचा....
पत्र तरी कसं म्हणायचं त्याला....
साधा उल्लेख देखील नाही केलास माझ्या नावाचा....

सगळी शब्द त्यातली
आठवत नाहीत मला नीटशी.....
पण एक आठवतं...... पापण्याआड लपून,
माझ्यासोबत वाचणाऱ्या, माझ्या आसवांचा....
माझ्या आधीच तोल गेला,
भिडले जाऊन त्या कागदाशी...
नेमके त्याच जागी, जी तेव्हा होती कोरी....
जिथे तू नेहमी लिहायचीस........." फक्त तुझीच "


अजून ही जपून ठेवला आहे
तू पाठवलेला तो शेवटचा SMS
call करून माझा आवाज ऐकण्याची
हिम्मत उरली नसेल तुझ्याकडे....

आवाजातली आर्तता...
हुंदक्यांची तीव्रता....
अन श्वासातील अधीरता...
शब्दात मांडता येत नाही, किती सहजपणे विसरलीस तू.....

दोन वर्षांच्या नात्याचा, दोनच ओळीत
आरंभ आणि शेवट ही केलास अन....
शेवटी लिहिलेस ते दोन शब्द......"काळजी घे "...

त्यापेक्षा "काळाने जीव " घेतलेला बरा.......

-पंकज
स्वरचित

Marathi Kavita : मराठी कविता


Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
Re: आठ्वणींच संग्रहालय
« Reply #1 on: July 15, 2010, 02:50:34 PM »
farach chhan!!

Offline anolakhi

 • Jr. Member
 • **
 • Posts: 79
 • Gender: Male
  • http://www.durava.blogspot.com
Re: आठ्वणींच संग्रहालय
« Reply #2 on: July 15, 2010, 04:23:10 PM »
well i liked first one....but second also quite good

Offline pankh09

 • Newbie
 • *
 • Posts: 41
Re: आठ्वणींच संग्रहालय
« Reply #3 on: July 23, 2010, 06:27:30 AM »

धन्यवाद .......

Offline amols

 • Newbie
 • *
 • Posts: 2
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणी सदैव माझ्या सोबत राहतील........
Re: आठ्वणींच संग्रहालय
« Reply #4 on: August 18, 2010, 01:40:59 PM »
दोन वर्षांच्या नात्याचा, दोनच ओळीत
आरंभ आणि शेवट ही केलास अन....
शेवटी लिहिलेस ते दोन शब्द......"काळजी घे "...

त्यापेक्षा "काळाने जीव " घेतलेला बरा.......
खूप सुंदर ओळी आहे मित्रा हे वाचून मन भरून आले ह्या ओळीनी परत एकदा जुन्या  आठवनी जिवंत झाला
Thanks yaar