तिच्या आठवणींपासून असा
का पळतोस दूर तू
आहेत त्या तुझ्यासाठीच, वेड्या...
ती तुझी अन तिचाच तू....
जेव्हा येईल परत भेटायला
तिची आठवण तुझ्या दारी...
घेउन तिला मिठीत तुझ्या
सांग तुझी व्यथा सारी....
सांगेल मग ती ही तुला
"कशी या दुःखात ही मजा आहे
बघ कवीच्या नजरेने मला तू...
तुझ्या आयुष्यभराची मी सोबतीण आहे...."
उचल ती लेखनी आता
घे थोड़ी कागदे हाती...
होऊ दे मना सैर भैर
सोड तिच्या आठवांच्या गाठी...
अड़खळतील शब्द...थरथरतील हात
विरघळतील आसवे...या निळ्या रंगात...
तिची आठवणचं मग देईल तुझी साथ...
धीर धर थोडासा, होईल शब्दांची बरसात..
तिची आठवण आणि तुझी कविता....
येतील मग गुंफूनी हातात हात....
--पंकज सोनवणे....(स्वरचित)
०६-०१-२०१० (०३:०० म.पु.)