मित्रानो या कवितेत वाचण्या सारखं काही नसलं तरी याचा आशय मात्र एका मध्यम वर्गीय मुलाशी जुळलेला आहे.
जो यशस्वी होण्यासाठी झटत असतो.
अचानक एका उच्च वर्गीय मुलीला तो आवडायला लागतो आणि पुढे सांर असकाही घडतं...
जा गं माझ्याकडे वेळ नाहीये......
ये...कॉलेजला चाललायस ना
चल ना आज बंक मारुया
मस्त मजा करूया..
जा गं माझ्याकडे वेळ नाहीये.....
आईक ना क्लासमधून आल्यावर
मित्राच्या बर्थ-डे पार्टीला
माझ्यासोबत येशील ना..
जा गं माझ्याकडे वेळ नाहीये.....
इतका कसला अभ्यास करतोयस
चल ना आज चौपाटीला जाऊया..
जा गं माझ्याकडे वेळ नाहीये.....
आता लास्ट इअरही पासआऊट झालायस
चल ना..पिक्चरला जाऊया..
जा गं माझ्याकडे वेळ नाहीये.....
काय रे नोकरी मिळाली का?
मीळेल रे..डोन्ट टेक टेन्स..
कमॉन यार लेट्स एन्जोय...
केव्हातरी मला समजून घेशील का?
जा गं माझ्याकडे वेळ नाहीये.....
हे...हाय..!कुठे होतीस तुलाच शोधत होतो
चल सेलीब्रेट करूया..
आज मला नोकरी मिळालीय..
सॉरी..रुद्र आज माझ्याकडे वेळ नाहीये.....
प्लीज..सुनील माझी वाट पाहत असेल..
रुद्र .............................................