हळव्या दवात भिजले डोळे
तू सुंदर नाजूक फुलराणी
तुला पाहता..
ते सोनेरी किरण मरते तूझवर प्रेमापोठी
बागेतून जाता तू..
फुल बोलती तुझशी..
घे मझला कवेत फुलण्यासाठी..
ती पायवाट म्हणती..
धन्य आहे मी
तुझे नाजूक पाऊल पडती माझ्या माथ्यावरती
झाडावरी बसून, कोकीळ गाते गाणी, तुझ्या हट्टासाठी.
पानाच्या आडुनी खारुताई पाहते
ते हळव्या दवात भिजले डोळे
अन बोलती त्या पानास
कोण हि सुंदरी,
दररोज येती आपल्या बागेत
अन पाहते वाट त्या काट्याची
अन हळूच ढाळते चार अश्रू
त्या काट्याच्या प्रेमासाठी
अन तो काटा..........
बंद होतात , ओठ त्या खारुताईचे
अन ओले होतात मिठू मिठू डोळे......