Author Topic: तुझ्या आठवणी...  (Read 1013 times)

Offline pankh09

  • Newbie
  • *
  • Posts: 41
तुझ्या आठवणी...
« on: July 23, 2010, 06:36:17 AM »

माझ्या मनाचिया दारी
तुझ्या आठवणींची रांगोळी
ये एकदा आत... उघडूनिया दार
बघ भावनांच्या माझी... कशी पेटली ही होळी

तुझ्या आठवणींशी माझे मन
खेळी कोशिंबीर आंधळी
हाती लागता तीच, तिला
माझ्या अंगभर उधळी...
जाई न्हाहून असा मी
तुझ्या आठवणींच्या मृगजळी
उर फूटे आतून माझा पण
न येई हुंदकाही तोंडी
तुझ्या आठवणींची माझ्याशी
आळी मिळी गुप चीळी
कळेल का तुला कधी
माझी व्यथा ही निराळी
रोज जाई मी हसत हसत
तुझ्या आठवणींच्या सुळावरी

तुझ्या आठवणी इतक्या पण
फाटकी माझी झोळी....
जाती निसटुन हळुवार अन
मी लिहित जाई नव्या ओळी......--पंकज सोनवणे....(स्वरचित)

Marathi Kavita : मराठी कविता