तो जवळ असल्याचा भास असतो
तो न भेटल्यास मनाचा त्रास असतो
भेटला कि मग फक्त आभास असतो
असा हा त्याच्या प्रेमाचा सहवास असतो
प्रत्येक क्षणा क्षणाला मला तो आठवत असतो
मला भेटण्यास तो नेहमी तयार असतो
पाहुनी मला मग तो नेहमी कविताच करत राहतो
असा हा त्याच्या प्रेमाचा सहवास असतो
भेट न झाल्यास तो मग हुरहुरतो
माझ्याच आठवणीत खेळत बसतो
मी न येण्याचेच कोडे सोडवत बसतो
असा हा त्याच्या प्रेमाचा सहवास असतो
वेळ देऊनी हि न गेल्यास तो मग रागवतो
माफी माझी मागून आपली चूक दाखवतो
हे सर्व आहे म्हणूनच तो मज खूप आवडतो
असा हा त्याच्या प्रेमाचा सहवास असतो
मी आणि तीने केलेली कविता सुरवात तिची शेवट माझा