पावसामध्ये आकशात तू वर पाहतेस
काळ्याभोर आकाशात मग तू चांदण शोधतेस
ते तर दिसत नाही तुला .......................
मग तू मला का फटके मारतेस
रात्र उलटून गेल्यावर निखळ अशी पहाट आली
हृदय धडकल आणि मग मला तुझी आठवण आली
आम्झ्या शरीराने ओळखले त्या गार गार हवेला
आला होता तुला भेटून मग तो माझ्या वाटेला
आठवतंय!!... मला तू माझी वात पाहत असायची
चिडलेली आवडतेस म्हंटल्यावर राग धरून रहायची
केसाची आगाऊ बट सरकान कानामागे सरकवायची
गालावर तुझ्या मग जास्वंदाची खोटी लाली खुलायची
फोन वाजला माझा आणि लाईट चमकू लागली
त्यावर तुझे नाव पाहिले आणि खळी माझ्या गालावर उमटली